मेडिकल कॉलेज समाेर प्रहारचे कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : नवनिर्मित मेडिकल कॉलेजचे कंत्राटदार शापूरजी पालनजी कंपनीत काम करणा-या कामगार धाेरणाविराेधात व संगनमत करुन कामाचे बाेगस निरीक्षण करणा-या अधिका-यांच्या विराेधात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक महेश हजारे यांनी कंबर कसली असून त्यांचे नेत्रूत्वाखाली आज दि.१२ जानेवारीला सकाळी ११ वाजे पासून कामगारांनी चंद्रपूरच्या स्थानिक मेडिकल कॉलेज समाेर बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे.

दरम्यान आज या प्रतिनिधीने दुपारी या अन्नत्याग आंदोलन मंडपाला भेट दिली असता (आंदोलन मंडपात) बेमुदत उपाेषणास शामवेल पानवाल, शंकनाथ पेशने,नवज्याेत गेडाम, अमाेल लांडगे, सचिन बांबाेळे, बबलू बांबाेळे, दिनेश मेश्राम, संतोष देऊलवार, सिद्धार्थ खाेकाेले, गुणवंत रामटेके, अनिकेत रामटेके, अरविंद बांबाेळे आदीं कामगार बसले असल्याचे दिसून आले .हे व्रूत्त लिहीपर्यंत कुठल्याही अधिका-यांनी या आंदाेलनाची दखल घेतली नव्हती. आपल्या रास्त मागण्यांची साेडवणूक व्हावी या साठी वारंवार वरिष्ठांचे उंबरठे झिजविले परंतु त्यांनी या कडे सहानभूतिने लक्ष न पुरविल्यामुळे अन्नत्याग आंदाेलनाचा मार्ग पत्करावा लागल्याची प्रतिक्रिया अनेक कामगारांनी या वेळी दिली.

जाे पर्यंत आमच्या रास्त मागण्या पूर्ण हाेत नाही ताे पर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहिल असे कामगारांचे म्हणणे आहे. तर चंद्रपूर रामनगरचे पाेलिस निरीक्षक राजेश मुळे यांनी उपराेक्त कामगारांनी काेराेना परिस्थिती लक्षात घेता बेमुदत आंदोलन न करता आपल्या भावना व विचार लेखी स्वरुपात जिल्हाधिका-यांना कळवावे अश्या आशयाचे पत्र महेश हजारे यांना दि.११ जानेवारीला दिले असल्याचे कळते.
मेडिकल कॉलेज समाेर प्रहारचे कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन ! मेडिकल कॉलेज समाेर प्रहारचे कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन ! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.