सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
सावली : कोविड, ओमायक्राॅनचा धोका लक्षात घेता १५ फरवरीपर्यंत शाळा बंद करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. या आदेशामुळे पालक व ग्रामिण भागातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे त्यामुळे सावली पंचायत समितीचे सभापती व सरपंच, उपसरपंच, पालक यांनी शाळा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पाठविले आहे.
मागील 2 वर्षापासुन शाळा बंद होत्या काही महीण्यापूर्वी शाळा सुरू झालेल्या आहेत व ते सुध्दा बंद करण्यात आल्याने ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांनाचे फार शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामिण भागात मोबाईल व नेटवर्कचा प्रश्नामुळे मागील काळात एकही विद्यार्थी आॅनलाईन शिक्षण घेऊ शकला नाही. ग्रामिण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव फार कमी असल्याने व विदयार्थ्यांची संख्या फारच कमी असल्याने शाळाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक ग्रामपंचायतीना दिला पाहीजे. अशी मागणी केली आहे.
पंचायत समिती सावली अंतर्गत तालुक्यातील विद्यार्थी पटसंख्या फारच कमी आहे. वर्ग १ ते १२ वि पर्यंत असलेल्या शाळा एकुण १२० आहेत. त्यापैकी १ ते ३० पटसंख्या असलेल्या शाळा २९ आहेत. ३१ ते ५० पटसंख्या असलेल्या शाळा १८ आहेत. ५० ते १०० पटसंख्या असलेल्या शाळा १९ आहेत व १०१ ते २०० पटसंख्या असलेल्या शाळा ३४ आहेत तर २०१ पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळा २० आहेत. त्यामुळे १०० पटसंख्या असलेल्या शाळा कोरोनाचे नियम पाळून नियमित सुरू होऊ शकतात तर जास्त पटसंख्या असलेल्या शाळा एकदिवसाआड घेता येईल. असेही निवेदनात सुचविले आहे.
शाळा बंद असल्यास मुले कोणतेही कोरोनाचे नियम न पाळता गर्दीत व इतरत्र भटकत असतात. शाळा सुरू असल्यास कोरोना किंवा इतर आजाराचे लक्षण लवकर लक्षात येऊन उपचार करता येते. शाळा बंद असल्यास शैक्षणिक नुकसानीसोबतच आरोग्याची काळजी पालकांना आहे. शासनाने आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला आहे मात्र ग्रामिण भागातील ९० टक्के पालकांकडे अॅंड्राईड मोबाईल नाही. ज्यांचेकडे मोबाईल आहे त्यांचा मुलांकडून शिक्षणासाठी वापर न करता गेमसाठी वापरत असल्याचा अनुभव आलेला आहे. ग्रामिण भागातील मुले गावातीलच शाळेत जात असल्याने पायीच जातात. त्यामुळे वाहनातुन दाटीत जाण्याचा प्रश्नही येत नाही.
कोविडची परीस्थिती लक्षात घेता स्थानिक पातळीवर शाळा बंद करता येईल. परंतू सरसकट शाळा बंद करणे हे ग्रामिण जनतेवर अन्यायकारक आहे. असल्याने ग्रामिण भागातील शाळा सुरू करावे अशी मागणी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, सदस्या छाया शेंडे, व्याहाड खुर्दचे सरपंच सुनीता उरकुडे, जीबगावचे सरपंच पुरुषोत्तम चुधरी, उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे, पेंढरी मक्ता सरपंच ठुमदेवी वलादे, घोडेवाही उपसरपंच चेतन रामटेके, केरोडा उपसरपंच ओमप्रकाश ढोलणे, व्याहाड खुर्द उपसरपंच भावना बिके, हिरापूर शाळा अध्यक्ष संजय सायत्रावार, पालक अजय मारकवार, ईश्वर बट्टे, श्रीकांत बहिरवार, सचिन इंगुलवार, राकेंद्र वलादे यांनी तहसीलदार सावली यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदन पाठविले.
ग्रामिण भागातील शाळा सुरू करण्यात यावे - सावली तालुक्यातील पदाधिकारी यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 12, 2022
Rating:
