सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : राजमाता जिजाऊ साहेब भोसले आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मार्गदर्शन व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमाला प्रमूख मार्गदर्शक म्हणून प्रा. श्याम हेडाऊ यांची उपस्थिती होती. या व्यतिरिक्त यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, सायली येरणे, वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक रुपेश पांडे प्रामुख्याने हजर हाेते.
दरवर्षी प्रमाणे यंदा ही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमीत्य युवा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
यावेळी युवकांना मार्गदर्शन करतांना प्रा. श्याम हेडाऊ यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे उच्च विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत. स्वामी विवेकानंद हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. धर्म, इतिहास ,कला, विज्ञान, साहित्य या सगळ्याच क्षेत्राची त्यांना अचूक जाण होती.
शिक्षणासोबतच शास्त्रीय संगिता बाबतही त्यांना माहिती होती. असे ते म्हणाले, देशाला महासत्ता बनविण्याकरिता आजच्या युवा वर्गाची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे युवकांनी उच्च शिक्षीत होऊन समाजाची आणि देशाची सेवा करावी, असे ही यावेळी बोलतांना प्रा. हेडाऊ म्हणाले.
या कार्यक्रमाला विलास वनकर, अमन खान, रणकीत वर्मा, विक्की रेगंटीवार, दुर्गा वैरागडे, आशा देशमूख, आनंद रणशूर, मंगेश अहिरकर यांच्यासह युवक युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 12, 2022
Rating:
