सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्षांपासून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. फेसबुक ऍप च्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून त्यांच्यात जवळीक निर्माण होऊन आरोपीने तिला प्रलोभने देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार महिलेने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. दोघेही विवाहित असून दोघांनाही मुलंबाळं आहेत. दोघांमध्ये असलेल्या शारीरिक संबंधाची कुणकुण महिलेच्या पतीला लागताच तो तिच्यापासून वेगळा राहू लागला. त्यानंतर महिलेने प्रियकराला लग्नाची गळ घातल्याने त्याने तिच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला. शहर व तालुक्यात लैंगिक अत्याचार व शारीरिक शोषणाच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींच्या न कळतेपणाचा, असहाय्य महिलांच्या निरागसतेचा तर विवाहित महिलांच्या शारीरिक आकर्षणाचा फायदा उचलून त्यांना वासनांधतेला बळी पाडलं जात आहे. अल्पवयीन व तरुण मुलींचे घरून पळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. संसार थाटून मुलंबाळं झालेल्या महिलाही सांसारिक जीवनात प्रामाणिक न राहता अनैतिक संबंधांना बळी पडून सांसारिक जिवन उध्वस्त करू लागल्या आहेत. अल्पवयीन व तरुण मुली टार्गट मुलांच्या नांदी लागून आपल्या शैक्षणिक जिवनाची तर विवाहित महिला प्रलोभनाला बळी पडून आपल्या सांसारिक जिवनाची वाट लावतांना दिसत आहे. मागील काही वर्षांमध्ये लैंगिक अत्याचार व शारीरिक शोषणासंदर्भातील तसेच तरुण मुलींच्या घरून पळून जाण्यासंदर्भातले प्रकरणं चांगलेच वाढले आहेत. सामाज माध्यमं महिला पुरुषांमध्ये अनैतिकता निर्माण करून त्यांना चुकीच्या वाटेकडे वळवू लागले आहेत.
शहरातील पंचशील नगर येथे राहणाऱ्या मयूर खां साहेब खां पठाण (२४) याची फेसबुकच्या माध्यमातून शहरातील एका विवाहित महिलेशी मैत्री झाली. मैत्रीतून ते एकमेकांच्या जवळ आले, व त्यांच्यातलं नातं आणखीच घट्ट होत गेलं. मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात होऊन त्यांच्यात शारीरिक आकर्षण निर्माण झालं. प्रियकराने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाच्या भूलथापा देऊन आरोपीने सतत दोन वर्ष तिचे शारीरिक शोषण केले. दोघांमधील अनैतिक संबंधाची कुणकुण महिलेच्या पतीला लागली. त्यानंतर तो तिच्यापासून वेगळा राहू लागला. प्रियकराशी शारीरिक संबंध ठेऊन पती पासून दुरावलेल्या महिलेने नंतर प्रियकराला लग्नाची गळ घातली. पण शारीरिक शोषण केल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला. त्याने आपला शारीरिक उपभोग घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तिने वणी पोलिस स्टेशनला येऊन त्याच्या विरुद्ध अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी तत्काळ आरोपी मयूर खां साहेब खां पठाण याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७६(२)(N), ४१७,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रवीण हिरे व पोलिस शिपाही विजय राठोड करित आहे.
विवाहित महिलेचे दोन वर्षांपासून शारीरिक शोषण, आरोपीवर गुन्हा दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 21, 2022
Rating:
