सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
इनर व्हील महिला उत्सव महिला सशक्तीकरण व बाल विकास हा सामाजिक उपक्रम या द्वारे आयोजित केल्या जातो. या इनरव्हिल महिला उत्सवाचे उद्घाटन बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील संचालिका स्मिता नांदेकर व त्यांच्या आश्रमातील जेष्ठ वृद्धांच्या हस्ते करण्यात आले वणीचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार व ललिता बोदकुरवार तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रुती उपाध्ये सचिव पूजा गडवाल, कमलेश लाल अंजूला चिंडालिया ,तनवी देशपांडे मंगला ठाकरे इंदू सिंग पूनम सिंग छाया बुटले, अनिता टोंगे, आरती सातपुते प्रतिभा मानकर श्वेता जोई, भारती तलसे नुपवंती गाडगे पूनम राठोड मानवी शुगवाणी शुभलक्ष्मी ढुंमे नंदा देसाई व वृषाली देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे माननीय आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील वृद्धांचे थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने लोकरीची टोपी व आधारासाठी काठी देण्यात आली. नगर परिषद शाळा क्रमांक 7 च्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले .चित्रकला स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेचे परीक्षण श्री संतोष म्हसे सरांनी केले .तसेच रॅम्प शो ,संगीत खुर्ची हौजी व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले महिलांच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध वस्तूंचे स्टॉल या महिला उत्सवात लावण्यात आले होते. या उत्सवाला माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी इनरव्हील क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन जीशान शफी यांनी केले व कार्यक्रमाची सांगता अनिता टोंगे यांनी केली.
इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी तर्फे इनरव्हील महिला उत्सव संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 09, 2022
Rating:
