मच्छिन्द्रा ग्रामपंचायतीत गाजला स्मशानभूमीचा विषय


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : मौजा मच्छिन्द्रा येथे आज दि.८ जानेवारी २०२२ रोजी पार ग्रामसभा पडली. आजच्या ग्रामसभेचा मुख्य विषय होता घरकुल. परंतु घरकुल यादी चा विषय मांडत असतांनाच स्मशानभूमी चा विषय काढून ग्रामसभेत गोंधळ उडाला आणि लवकरच ग्रामसभेचा गाशा गुंडाळण्यात आला. त्यामुळे मच्छिन्द्रा ग्रामपंचायतीत घरकुलाचा विषय राहून गेला अन स्मशानभूमीचा विषय सभेत चांगलाच गाजला असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

या सभेमध्ये येथील मंजूर जागेवर स्मशानभूमी न बांधता दुसरीकडेच बांधण्याचा घाट माजी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्याचा नामोउल्लेख करून विषय क्लोज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरीकांनी कडाडून त्यालाही विरोध केला. त्याच वेळी माजी जेष्ठ सरपंच श्रीधर पेंदोर हे सभेत काही वेळातच हजार झाले आणि त्यांनी स्मशानभूमीची मंजूर जागा आहे त्याच जागी स्मशानभूमी बांधा,असा अतिशय मोलाचा सल्ला दिला. त्यांना अनेकांनी सहमतीही दर्शविली. 

सदर सभेत उपस्थित केलेल्या मंजूर स्मशानभूमीचा मच्छिन्द्रा येथे बांधकाम न करता तो सरसकट गट ग्रामपंचायत मधील बामर्डा येथे बांधकाम करण्याचा घाट येथील काही नागरिकांत दिसून आला. त्याला बहुतांश नागरिकांकडून कडाडून विरोध करीत आज रोजी मंजूर स्मशानभूमी साठी लेखी निवेदन (ठराव) नागरिकांनी स्वतः स्वाक्षरीकरून देण्यात आले आहे.

मच्छिन्द्रा येथील ग्रामसेवक गाडेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत घरकुलाच्या योजनेचा लाभ थेट खुल्या मैदानात समक्ष ग्रामस्थांना ग्रामपंचायत सचिव यांनी सविस्तर पटवून सांगितला. यावेळी बहुतांश माजी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील असंख्य महिला पुरुष उपस्थित होते. आता ग्रामपंचायत या दिलेल्या निवेदनावर (ठराव) काय पाऊल उचलतात याकडे समस्त गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मच्छिन्द्रा ग्रामपंचायतीत गाजला स्मशानभूमीचा विषय मच्छिन्द्रा ग्रामपंचायतीत गाजला स्मशानभूमीचा विषय Reviewed by सह्याद्री चौफेर on January 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.