पतंगीच्या धाग्यामुळे दुचाकी चालकाचा गळा चिरला

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जानेवारी महिणा आला की ख-या अर्थाने युवकांना पतंग उडविण्यांचा आनंद मनसाेक्त लुटता येताे. शहरासह आता ग्रामीण भागातही पतंग उडविणारे पतंग प्रेमी माेठ्या प्रमाणात तयार झाले आहे पतंग उडवितांना काळजी घेणे तेव्हढेच महत्वाचे व आवश्यक आहे. कधी काळी या पतंगबाजीमुळे पतंग लुटणा-यांचा अपघातात जीव जावू शकताे आज अश्याच आशयाची एक घटना चंद्रपूर नजिकच्या घुग्घुस या गावी घडली. या घटनेत एका दुचाकी चालकाचा पतंगीच्या धाग्याने गळा चिरला असून ताे या वेळी आपल्या ड्यूटीवर जात हाेता. त्या युवकाचे नाव प्रदीपसिंह असल्याचे कळते.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात पतंग व धागे विक्री जाेरात सुरु आहे . शक्यताे तिळसंक्राती पर्यंत ही विक्री सुरु असते.
पतंगीच्या धाग्यामुळे दुचाकी चालकाचा गळा चिरला पतंगीच्या धाग्यामुळे दुचाकी चालकाचा गळा चिरला  Reviewed by सह्याद्री चौफेर on January 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.