सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी तालुक्यातील पुनवट येथे वास्तव्यास असलेल्या अमोल गजानन पिदूरकर (३५) या शेतकऱ्याच्या घरी ६ जानेवारीला अज्ञात चोरट्याने चोरी करून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेल्या १९ हजार रुपये रोख रक्कमेवर हात साफ केला. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला, व लोखंडी कपाटात ठेवलेले रोख १९ हजार रुपये चोरून नेले. घरातील सदस्य शेतातून परत आल्यानंतर त्यांना घरी चोरी झाल्याचे कळले. अमोल पिदूरकर यांनी अज्ञात चोरट्याने घरी चोरी करून १९ हजार रुपये चोरून नेल्याची शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. ६ जानेवारीला तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात चोरी प्रकरणाचा कसून तपास करण्यात आला. ७ जानेवारीला पोलिसांना गावातीलच ईसम अमोल पिदूरकर यांच्या घरी शिरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गणपत मधुकर सूर (३०) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने चोरी केल्याची कबुली देत, चोरी केलेल्या रक्कमेपैकी १७ हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. शिरपूरचे ठाणेदार गजानन कारेवाड यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या चोरी प्रकरणाचा छडा लावून चोरट्याला जेरबंद केले. त्याच्यावर भादंवि च्या कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन करेवाड, शिरपूर पोलिस स्टेशनचे प्रमोद जुनुरकर, सुनील दुबे, अभिजित कोषटवार, गजानन सावसकडे यांनी केली.
चोरी प्रकरणाचा शिरपूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत लावला छडा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 08, 2022
Rating:
