सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
गोंडपिपरी : काल दि.८ शनिवारी रात्री पत्नीला कुऱ्हाडीने मारून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील भंगाराम तळोधित घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीत रात्री वाद झाला वादानंतर पतिने पत्नीला विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला नंतर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले. घटनेनंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी राजू बावणे वय अंदाजे (42) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उपचारासाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतक योगिता राजू बावणे वय (35) यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. हत्येचे कारण अद्याप कळले नाही.
पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गर्शनात सुरू आहे.
कुराडीने वार करून पत्नीची निर्घृण हत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 09, 2022
Rating:
