Top News

मालपिरंजी येथे स्मशानभूमी मध्ये नवीन हातपंपाचे भूमिपूजन

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तालुक्यातील कवठी पं.स.क्षेत्रात येणाऱ्या मालपीरंजी या गावात स्मशान भूमी मध्ये नवीन हातपंपाची गरज लक्षात घेऊन पंचायत समितीच्या माजी सभापती तथा पं सं.सदस्य सौ.छायाताई शेंडे यांनी 15 वा वित्त आयोग (पं. स.स्तर) अंतर्गत 1.25 लाख मंजूर करून नवीन हातपंप मंजूर करून घेतला.
     
यावेळी हातपंपाचे भुमिपूजन सौ छायाताई शेंडे सदस्य पं. स.सावली यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित अर्जुन भोयर कोषाध्यक्ष भाजपा सावली ,प्रकाश पा.गड्डमवार जेष्ठ नेते भाजपा सावली,जगन संगावार,रघुनाथ नैताम,सुरेश गोरलावर,जांकिराम मडावी संतोष एडमलवार,नानाजी एडमलवार,गजानन एडमलवार,मारोती कुळमेथे, सुनीता जुमनाके,शीतल मडावी,दिलीप गडमवार,राकेशभाऊ मडावी,दीपक शेंडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post