काेरपना महसूल विभाग पथकाच्या धडक कारवाया , अवैध गाैण खनिजाची तीन वाहने जप्त !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : आज रविवार दि.१६ जानेवारीला महसूल विभागाच्या एका पथकाने दुपारी ३:३०वाजताच्या दरम्यान अवैध गौण खनिज धडक मोहिमेत तीन हायवाना दंडात्मक कारवायांसाठी ताब्यात घेतल्याचे व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे . गाैण खनिज तपासणी करताना या पथकात प्रामुख्याने काेरपनाचे नायब तहसीलदार प्रवीण चिडे,मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, कोरपनाचे तलाठी प्रकाश कमलवार हे हजर हाेते.

राजूरा येथील जय मातादी ट्रान्सपोर्ट यांचे मालकीचे 3 हायवा ट्रकने [गाडी क्र. Mh34 ab7345,mh40 n 2249,mh40 n 2763] चुनाळा येथून लाल मुरूम वाहतूक करीत हाेते त्या मुरुमचा उपयाेग गडचांदुर ते आदीलाबाद या रोड सायडिंग साठी करीत असल्याचे समजते. परंतु (वाहतुक मुळ) टीपीवर चुकीच्या वेळेचा वापर केल्याचे काेरपना महसुल पथकाला दिसून आले.पथकांनी तपासणी केली असता जावक पावती मध्ये बरीच तफावत असल्याचे दिसून आले आहे. पथकाने जप्तीनामा कारवायां करीत सदरहु वाहने तहसील कार्यालय परिसरात जमा केले आहे .महसुल पथकाच्या या कारवायांमुळे या परिसरातील
अवैध गौण वाहतुकदाराचे अक्षरशा धाबे दणाणले आहे उपराेक्त वाहनांवर आता काेरपना तहसीलदार हे नेमकी कोणती कार्यवाया करतात या कडे सा-या जनतेचे लक्ष वेधलेले आहे.
काेरपना महसूल विभाग पथकाच्या धडक कारवाया , अवैध गाैण खनिजाची तीन वाहने जप्त ! काेरपना महसूल विभाग पथकाच्या धडक कारवाया , अवैध गाैण खनिजाची तीन वाहने जप्त !  Reviewed by सह्याद्री चौफेर on January 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.