अंगीकृत कार्य निष्ठेने पार पाडले पाहिजे - माधव सरपटवार

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : "असा मी तसा मी" या विषयावर माझं गाव माझा वक्ता या व्याख्यान मालेत 5 वे पुष्प गुंफण्याचे कार्य प्रसिद्ध सामाजिक कार्यात अग्रेसर, संयमी, शांत, अष्टपैलू व्यक्ती माधव सरपटवार म्हणाले असा मी म्हणजे माझ्या शालेय जीवनात महाविद्यालयात मी कसे कार्य केले व मला नौकरी, छोकरी कशी मिळाली त्यांनी उत्तम मांडणी केली. राजूरकर गुरुजी यांच्यामुळे मी सामाजिक कार्यात आलो व माझ्या तसा मी ला प्रवास सुरु झाला. सामाजिक कार्य करत असतांना मला लोकांनी खूप टीका केल्या पण मी खंबीर पणे कार्य केले. शिक्षक असल्याने विद्यार्थी घडवले, माणूस घडविले म्हणून मला पोलिस स्टेशन पाहावे लागले. मात्र मी डगमगलो नाही. माझ्या संसारिक आयुष्यात सुद्धा प्रचंड दुःख आले होते. मात्र मी कोणालाही न सांगता त्यावर मात केली. माझ्या बायकोची सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात मोलाची साथ होती.

प्रसिद्ध साहित्यिक राम शेवाळकर हे वणीत प्राचार्य म्हणून रुजू झाले व त्यांच्याशी घट्ट मैत्री झाली. 
त्यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनात अनेक राज्यस्तरीय व विदर्भस्तरीय कार्यक्रम आयोजित केल्या गेले. त्या प्रत्येक कार्यक्रमात महत्त्वाची जबाबदारी माझ्याकडे होती. माझ्या सार्वजनिक जीवनाचे शिल्पकारच ते होते. सांगण्यासारखं खूप आहे पण एकच सांगतो. मला सुद्धा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले आहे. पोलीस स्टेशन, कचेरी, दवाखाने, समाजाच्या प्रखर टीका, असह्य वेदना सहन केल्या. एकट्याने सुरुवात केली तर ती पूर्ण करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय वणी द्वारे माझं गाव माझा वक्ता या उपक्रमात व्याख्यान मालाचे अध्यक्ष गजानन कासावार होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सरपटवार यांनी आपले जीवन जगतांना दोन्ही बाजू कमी वेळात मांडल्या व विषय वेगळा निवडला, आम्ही सगळे यांच्या पासूनच चांगल्या गोष्टी शिकलो असे मत व्यक्त केले. सूत्र संचालन अभिजित अणे, प्रास्तविक प्रा. स्वानंद पुंड व आभार शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव जेष्टरंगकर्मी अशोक सोनटक्के यांनी केले. या व्याख्येन मालासाठी नगर वाचनालयाचे कर्मचारी प्रमोद लोणारे, देवेंद्र भाजीपाले, राम मेंगावार यांनी विशेष सहकार्य केले.
अंगीकृत कार्य निष्ठेने पार पाडले पाहिजे - माधव सरपटवार अंगीकृत कार्य निष्ठेने पार पाडले पाहिजे - माधव सरपटवार Reviewed by सह्याद्री चौफेर on January 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.