"घर तेथे शिवसैनिक" सदस्य नोंदणी अभियानाचा संजय देरकर यांच्या वाढदिवशी होणार शुभारंभ


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवशी म्हणजे १७ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत शिवसेनेला एक हाती सत्ता मिळावी, याकरिता "घर तेथे शिवसैनिक" सदस्य नोंदणी अभियान राबवून वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला अधिक बळकट करण्याचे कार्य हाती घेतले जाणार आहे. नगर पालिका निवडणूक जिंकून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू हा ध्यास मणी धरून शहर शिवसेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान धडाक्यात राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या निर्देशानुसार पक्षाचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद नेरकर मुंबई, वणी विधानसभा संपर्क प्रमुख विनोद पेडणेकर मुंबई, शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून "घर तेथे शिवसैनिक" सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवशी म्हणजे १७ जानेवारीला करण्यात येणार आहे. लवकरच होणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत वणी नगर परिषदेमध्ये शिवसेनेचीच सत्ता यावी, याकरिता शहर शिवसेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबवून शिवसेनेला शहरात आणखी बळकटी देण्याचे कार्य करण्यात येणार आहे. त्याकरिता शिवसेनेचे उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख व शाखा प्रमुखांनी या सदस्य नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग दर्शवून या अभियानाला सर्वोतपरी यशस्वी करण्याचे आव्हान शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी केले आहे. 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना कुणीही पुष्पगुच्छ देऊन व्यर्थ खर्च न करता वही, बुक व पेन द्यावी. जेणेकरून ती गरजू, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता उपयोगी पडेल. आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ते देता येईल, व त्यांच्याकरिता ती मोलाची मदत ठरेल. त्यामुळे शुभेच्छुकांनी पुष्पगुच्छा ऐवजी वही, बुक, पेन देऊन संजय देरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या, असे जाहीर आव्हान नारी सक्षमीकरण संघटनेच्या नेत्या व संजय देरकर यांच्या अर्धांगिनी किरण संजय देरकर यांनी केले आहे.
"घर तेथे शिवसैनिक" सदस्य नोंदणी अभियानाचा संजय देरकर यांच्या वाढदिवशी होणार शुभारंभ "घर तेथे शिवसैनिक" सदस्य नोंदणी अभियानाचा संजय देरकर यांच्या वाढदिवशी होणार शुभारंभ Reviewed by सह्याद्री चौफेर on January 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.