सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील मारहाणीच्या तीन वेगवेगळ्या गुन्हातील आरोपीस दोन वर्षे कारावास व तिन हजार रूपये दंड अशी शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी आरोपी अभिमान तुळशीराम राजुरकर रा. वेगाव यास सुनावली आहे. फिर्यादीचे घरा शेजारी आरोपी अभिमान यांचे घर लागून आहे. आरोपी हा दारू पिऊन कोणतेही कारण नसताना भांडणी करायाचा. दि.2 मे 2014 रोजी आरोपी हा दारू पिऊन हातात सुरा व कुऱ्हाड घेवून फिर्यादीचे घरी असलेल्या आई व पत्नीला अश्लील शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.दुसऱ्या घटनेत दि. 2जुलै 2014रोजी फिर्यादी महिला आपले घरी भांडी घासत असताना आरोपी हा दारूचे नशेत फिर्यादीला पाहुन अश्लील शिवीगाळ करत कंबर मोडण्याची धमकी देत होता. त्यावेळी फिर्यादीचे पती तेथे येऊन माझ्या पत्नीला वाईट का बोलत आहे.अशी विचारणा केली असता आरोपी अभिमान यांनी पतीला काँलर पकडुन मारहाण केली. यावरून यातील सर्व फिर्यादीनी आरोपी.विरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला व तपास पुर्ण करून तीन्ही प्रकरण न्यायप्रविष्ट केले प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी डॉक्टर तपास अधिकारी यांचे सह इतर साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कारावास व तीन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील चैताली एस खांडरे व कोर्ट पैरवी जमादार ढुमणे यांनी काम पाहीले.
आरोपीस दोन वर्षाचा कारावास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 16, 2022
Rating:
