जन्मांध मायासाठी सरसावले मदतीचे हात (जीवनावश्यक वस्तु सह केली आर्थिक मदत)

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 

महागाव : जन्मताच आलेले अंधत्व त्यात पाच वर्षांची असतांना आईचा मृत्यु झाल्यानंतर वडीलच तिच्यासाठी सर्वस्व बनले वडिलांची ही मुलीच्या पालनपोषणाची धडपड बघुन समाजमन गहिवरून आले व मदतीसाठी सरसावले.

हदगाव तालुक्यातील हरडफ येथील वाठोरे दाम्पत्याला माया नावाची मुलगी झाली परंतु ती जन्मांध असल्याने या दाम्पत्याने तिचा सांभाळ करण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली .सर्व सुरळीतच चालु असतांना अचानक आजारपणाने आईचा मृत्यु झाला आता मायाच्या पालनाची सर्वस्वी जबाबदारी वडील भिमराव वाठोरे यांच्यावर आली मोलमजुरी करून ते आपल्या मुलीचा सांभाळ करीत आहेत.

गावात काम मिळत नसल्याने त्यांनी गावातील नागरिकांसह ऊसतोडी साठी जाण्याचा मार्ग निवडला व ते मायाचे सर्व दैनंदिन कामे आटोपुन ऊस तोडण्यासाठी जात अशातच ही ऊसतोड करणारी मजुरांची टोळी महागाव तालुक्यातील कासारबेहळ येथे आली असतांना नंदकुमार मस्के यांना याबाबत कळाले अंध मुलीसाठी पित्याची धडपड पाहुन त्यांनी ही गोष्ट माजी पंचायत समिती सदस्य संदीप ठाकरे, मोहनराव कर्हे, टेंभी चे सरपंच अमोल चिकणे, यांना सांगितली त्यांनी व गावकऱ्यांनी आपल्या मानवता धर्माची जाण ठेवुन अंध मायाला आर्थिक व जीवनावश्यक वस्तुची मदत करून तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नंदकुमार मस्के,अवधुत पंडागळे, संजय पावडे,सुधाकर चिकने, सचिव आशिष देशमुख, साहेबराव राठोड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
जन्मांध मायासाठी सरसावले मदतीचे हात (जीवनावश्यक वस्तु सह केली आर्थिक मदत) जन्मांध मायासाठी सरसावले मदतीचे हात (जीवनावश्यक वस्तु सह केली आर्थिक मदत) Reviewed by सह्याद्री चौफेर on January 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.