टॉप बातम्या

वरळी मटका अड्यावर छापा, चार जण ताब्यात

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : शहर पोलिसांनी येथील बाजार भागातील बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या मटका अड्यावर धाड टाकून मटका खेळवीणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पाच ते सहा च्या वाजताच्या दरम्यान करण्यात आल्याचे समजते.
छाप्याची चाहूल लागताच मटका चालवीणाऱ्यात पळापळ सुरु झाली. अशातच चार जणांना मारेगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार मोहंमद जुबेर मोहंमद जावेद यांच्यासह सतिश महादेव कोराटे (५०), अंकुश कनाके (४८), श्रीकांत नेहारे (३०) सर्व रा.मारेगाव असे ताब्यात घेतलेल्यांची नाव आहे. या चार जणांच्या विरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्यांच्या कडून मटका खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम असा २७२० असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मारेगाव एपीआय राजेश पुरी, जमादार आनंद,नितीन खांदवे,रौडी राठोड यांनी छापा मारून कारवाई केली.

ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार आनंद आलचेवर करित आहे. 
Previous Post Next Post