टॉप बातम्या

"स्व. राजकमलजी भारती कला,वाणिज्य महाविद्यालय आर्णी येथे पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन"

सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख 

आर्णी : गृह अर्थशास्त्र विभागातर्फे कमवा आणि शिका उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी साठी पुष्परचना सजावट आणि सादरीकरण या विषयावर प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन आर्णी येथील स्व राजकमल भारती कला, वाणिज्य महाविदयालयात करण्यात आले. 
सर्व प्रथम श्री दत्त प्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजयजी भारती यांनी कार्य शाळेला दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉक्टर आर. एम. तातेड यांनी गृह अर्थशास्त्र विषयाची उपयुक्तता स्पष्ट करताना पुष्परचना सजावट विद्यार्थिनींना रोजगार सक्षम बनवू शकतो असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. वानखेडे यांनी भारतीय संस्कृतीतील ललित कला व पुष्परचना यांच्यातील सहसंबंध लक्षात घेऊन आपल्या सुप्त कलागुणांना संधी द्यावी असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रा.डॉ.मनीषा क्षीरसागर यांनी पुष्प कला व मानवी जीवन यावर प्रकाश टाकला. द्वितीय सत्रात कुमारी प्रणाली अगलदरे यांनी कचर्‍यातून कला आणि पुष्परचना यांचे प्रात्यक्षिक दाखविले. 

कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात डॉ. तातेड यांनी स्वयंरोजगार याकरिता अशा प्रकारच्या कार्यशाळा उपयोगी असल्याने त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता प्रा. डॉक्टर मनीषा क्षीरसागर आणि गृह अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी प्रयत्न केले.
Previous Post Next Post