अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाच्या वणी येथील चार मटका अड्ड्यांवर व दोन सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धाडी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी येथे अमरावती विभागाच्या पोलिस महानिरीक्षक पथकाने चार मटका अड्ड्यांवर व दोन सुगंधित तंबाखू विक्रेत्यांच्या गोदाम व दुकानावर धाडी टाकून लाखोंच्या मुद्देमालासह ३५ ते ४० आरोपींना अटक केली आहे. अमरावती पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक पोलिस पथकासह अचानक वणी येथे धडकले. कुणाला काही न कळायच्या आत एकाच वेळी चार मटका अड्ड्यांवर त्यांनी धाडी टाकल्या. एवढेच नाही तर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांच्या घर, गोदाम व दुकानावर धाडी टाकून लाखो रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही केली. आज २९ जानेवारीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अमरावती विभागाचं विशेष पोलिस पथक वणीत दाखल झालं, व त्यांनी वणीत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर धाडसत्रच सुरु केलं. या धडक कार्यवाहीने कुठे पळापळ तर कुठे पाळण्याचीही वाट न मिळाल्याने मटका खेळणारे व खेळवणारे मोठ्या संख्येने पोलिसांच्या हाती लागले. आरोपींवर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु असून मुद्देमालाची पडताळणीही पोलिसांकडून केली जात आहे. पोलिस महानिरीक्षक पथकाची वणीतिल ही पहिलीच कार्यवाही असल्याची चर्चा सुरु आहे. आता पर्यंतच्या या सर्वात मोठ्या व धडक कार्यवाहीने अवैध धंदेवाल्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.

वणी येथे सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाने एकाच वेळी धाडी टाकल्याने चांगलीच खळबळ उडाली. एकता नगर, सिंधी कॉलनी व दीपक चौपाटी परिसरात सुरु असलेल्या मटका अंड्यांवर अमरावती येथिल विशेष पोलिस पथकाने धाडी टाकून जवळपास ३५ ते ४० जणांना अटक केली. यात मटकापट्टी फाडणाऱ्या व मटका खेळणाऱ्यांचा समावेश आहे. चार मटका अड्ड्यांवर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक मटका अड्डा तर नगर परिषदेच्या गळ्यात सुरु होता. त्या गाळ्याचे शटरच बंद करून पोलिसांनी आरोपींना पळवाट शोधण्याची संधीच दिली नाही. या मटका अड्ड्यावरून तब्बल सोळा आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाकी मटका अड्ड्यांवरून अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आकडा अद्याप कळू शकला नाही. 

शहरात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू अवैधरित्या काही व्यापाऱ्यांकडून विक्री केला जात असल्याचीही या विशेष पोलिस पथकाला माहिती असल्याने त्यांनी सिंधी कॉलनी येथिल व्यापाऱ्यांच्या घर, गोदाम व दुकानांवर धाडी टाकून सुगंधित तंबाखाचा मोठा साठा जप्त केला. अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. सर्वच आरोपींवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून जप्त केलेल्या मुद्देमालाचीही पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. जप्त केलेला मुद्देमाल लाखोंच्या घरात असून मुद्देमालाची निश्चित रक्कम अद्याप कळू शकलेली नाही. अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाची वणीतिल ही पहिलीच कार्यवाही असून या धडक कार्यवाहीने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक गोवर हसन यांनी पोलिस पथकासह ही धडक कार्यवाही केली. अमरावती वरून पोलिसांचा मोठा फौजफाटा वणीला आला आहे.
अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाच्या वणी येथील चार मटका अड्ड्यांवर व दोन सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धाडी अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाच्या वणी येथील चार मटका अड्ड्यांवर व दोन सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धाडी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.