सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी : येथील आयकॅन अकॅडमी व उडाण फिजिकल करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ महेंद्र लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिश्रम आणि जिद्द याची सांगड घालून कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होता येते हे डॉक्टर लोढा यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. प्रा. रवींद्र मत्ते यांनी यशाची चतूसूत्रे विद्यार्थ्यांना सांगितले. सबिया खान यांनीही आपले मत मांडले. यावेळी दोन्ही करिअर अकॅडमी संचालक सोपान लाड व गणेश आसूटकर तसेच अध्यक्ष स्थानी राजूभाऊ पहापळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. समीउल्लाह खान (अबूजी) यांच्या स्मृतीला उजाळा देत झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान लाड यांनी केले. प्रसंगी सर्वं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या नंतर ज्या क्षेत्रात ते यशस्वी झाले त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार मान्यवरांच्या व त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये वैभव चौलमावार (TCS), तुषार डवरे (TCS), कु.शीतल ठाकरे (इमफोसिस), कु. खुशबू चचडा (SBI क्लर्क), अमरीन शेख (SSB) ,कु. रक्षा गिरडकर (मुंबई पोलीस), कु.पुजा गुरनुले (मुंबई पोलीस), संतोष मग्गीडवार (MSF), कु.मनीषा शिवारकर (MSF), कु. माधुरी कोवे (MSF), इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घुगरे यांनी केले तर आभार भगत यांनी मानले.
वणीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 29, 2022
Rating:
