सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचलित,लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे
समाजशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हितगुज( commune ) अंतर्गत
"छायाचित्र व चलचित्र कार्यशाळा" घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी करियर ओरिएंटेड शिक्षण घेणे आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्य संबंधी जागरूक असायला पाहिजे. व नवीन कौशल्य प्राप्त करायला हवेत असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. नीलिमा दवणे यांनी केले, विद्यार्थ्याना कौशल्य पुर्ण शिक्षण मिळावं या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले. सागर मुने यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना छायाचित्र क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी मेहनत, जिद्द, प्रामाणिकता, नियोजन व सगळ्यात महत्वाचे कौशल्य पाहिजे, तरच या व्यवसायात आर्थिक उन्नती आहे तसेच व्हिडीओ एडिटिंग, फोटो अल्बम डिझाइन या क्षेत्रात खूप मागणी व उत्पन्न आहे. असे पहिल्या मार्गदर्शन सत्रात सांगितले.
दुसऱ्या सत्रात प्रात्यक्षिक करून फोटो कसे काढायचे याबाबत वणी नगरातील नामवंत फोटोग्राफर प्रशिक्षक रवींद्र काळे ,प्रमोद नवले, सागर मुने व सहकारी जीवन पंधरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. फोटोग्राफि कशा पद्धतीने करायची आणि व्हिडिओ कसे रेकॉर्ड करावेत आणि एडिट कसे करावेत. याबद्दलचे कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रशिक्षण घेणाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत, सर्व बारकावे माहिती करून घेतली व एक महिना प्रशिक्षण देण्यात यावे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशन घोगरे यांनी केले तर वैष्णवी निखाडे हिने आभार मानले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयात छायाचित्र प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 01, 2022
Rating:
