टॉप बातम्या

मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र मंडळाचे उदघाटन!


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी बुधवारला कला वाणिज्य व विज्ञान महा. मारेगाव येथे वनस्पतीशास्त्र विभागामार्फत वनस्पतीशास्त्र मंडळाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा डॉ गजानन सोडनर, विभाग प्रमुख इतिहास विभाग हे होते, तर प्रा डॉ किशोर सूरडकर, इंदिरा महाविद्यालय कळंब हे प्रमुख मार्गदर्शक होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ विनोद नु. चव्हाण, विभाग प्रमुख, वनस्पती शास्त्र विभाग यांनी तर सूत्रसंचालन प्रा स्नेहल भांदकर यांनी केले.
वनस्पती शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री फरहान शेख यांची निवड झाली तर कु पूजा मुळे (उपाध्यक्ष), कु जोती ठावरी (सचिव), कु मयुरी नन्ने (सहसचिव), व कु साक्षी देऊळकर (कोषाध्यक्ष) यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रा तानूरकर, प्रा घोडखांदे, प्रा कुलकर्णी, प्रा देशमुख, प्रा आत्राम, प्रा जेणेकर, प्रा चिरडे, प्रा राऊत, प्रा वांढरे, प्रा कांबळे मॅडम,श्री पंढरपूरे, श्री कुमरे, इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश घरडे यांनी नवीन वनस्पती शास्त्र मंडळाला शुभेच्छा वं प्रोत्साहन दिले तर प्रा अडसरे,प्रा माकडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अतिशय मोलाचे सरकार्य केले तर मंडळाचे प्रमुख प्रा स्नेहल भांदकर व प्रा डॉ विनोद चव्हाण विभाग प्रमुख यांनी सगळ्यांचे आभार मानले.
Previous Post Next Post