सेवा निवृत्त सूरदापूर येथील पोलिस पाटील रविन्द्र रेड्डी येलटीवार यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : १७ डिसेंबर "पोलिस पाटील दिवस" च्या औचित्याने दिनांक ९ जाने.२२ रोजी सूरदापूर येथे पोलिस पाटील दिवस व वार्षिक स्नेहसंमेलन तसेच निवृत्त पोलिस पाटील यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला श्री. पुलजलवार साहेब, एसडीपीओ वणी, श्री. जाधव साहेब, पोलिस स्टेशन, मुकुटबन, व संगीता हेलोंढे मॅडम, पोलिस स्टेशन पाटन व पोलिस पाटील संघटना पाटन अध्यक्ष श्री धवने पाटील, सचिव श्री. विनोद पेरकावार पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी सेवा निवृत्त सूरदापूर येथील पोलिस पाटील श्री. रविन्द्र रेड्डी येलटीवार पाटील यांचा सपत्नीक मान्य वरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. इंगोले पाटील, यांनी केले तर प्रास्ताविक सचिन कूलसगे पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मार्गदर्शन मध्ये एसडीपीओ साहेब यांनी पोलिस पाटील हा प्रशासनाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाला पोलिस पाटील संघटना, पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती. तसेच प्रकाश गेडाम पाटील, भोयर पाटील, पवार पाटील, कोरांगे पाटील, आत्राम पाटील, यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री पेरकावार पाटील यांनी केले.
सेवा निवृत्त सूरदापूर येथील पोलिस पाटील रविन्द्र रेड्डी येलटीवार यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार सेवा निवृत्त सूरदापूर येथील पोलिस पाटील रविन्द्र रेड्डी येलटीवार यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on January 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.