हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या बाबा हजरत चांदशहा वली दर्ग्याचा सर्वधर्मीय यांकडून जीर्णोद्धार पूर्णत्वास


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगांव : शहरातील जुनी वस्ती म्हणून ओळख असलेल्या प्र. क्र.२ मध्ये हजरत चांदवली बाबांचा पुरातन दर्गाह आहे. सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान असलेल्या ह्या दर्ग्यात अनेक श्रद्धाळू मन्नत,नवस बोलतात, मनोकामना पूर्ण झाल्यास नवस फेडण्याचे कार्यक्रमही इथे होतात.
      
मात्र,दर्गाह खूप पुरातन असल्यामुळे जीर्णोद्दार करायचे ठरवताच मदतीला धावले सर्वधर्मीय मारेगाववासी. सर्वधर्मीयांनी यथाशक्ती मदत करत वर्गणी गोळा करून मोठ्या उत्साहात जीर्णोद्दार करून मारेगांव ची साजेल अशी परंपरा कायम राखली.
        
उल्लेखनीय बाब म्हणजे दर्गा सभोवती दाट हिंदू वस्ती आहे, मात्र कुठलेही उणेदुने न बाळगता खेळीमेळीने व सर्वधर्मसमभावाने ह्या पवित्र दर्ग्याच्या जीर्णोद्धार करण्यात आला.    
रंगरंगोटी व सजावट करून जीर्णोद्धारातून उरलेल्या लोक वर्गणीतून भोजन दान करून हिंदू-मुस्लिम व सर्व धर्मीय एकता कायम राखल्याने सर्व स्तरातून कोतूक होत आहे. प्रत्येकानेच तन मन धनाने हा सोहळा पुर्णत्वास नेला असला तरीही खालील युवकांनी यात विशेष परीश्रम घेतले.

प्रवीण बोबडे,पंकज बोबडे, चींधुजी परचाके,प्रमोद काळे,तुषार डाखरे,समीर शेख जफर शेख असीम शेख, विशाल मिलमिले,अजू शेख,राजू राजूरकर, प्रमोद खडसे,शेख फरीद,शेख खलील व बाबा हजरत चांदशहा वली दर्गाह समिती व हिंदू मुस्लिम एकता ग्रूप घ्या वतीने सहकार्य करण्यात आले.
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या बाबा हजरत चांदशहा वली दर्ग्याचा सर्वधर्मीय यांकडून जीर्णोद्धार पूर्णत्वास हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या बाबा हजरत चांदशहा वली दर्ग्याचा सर्वधर्मीय यांकडून जीर्णोद्धार पूर्णत्वास Reviewed by सह्याद्री चौफेर on January 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.