सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
सावली : तीन कोटि छेचाळीस लाख रुपये खर्च करुण ईमारत सुसस्ज बांधकाम बांधण्यात आले. मात्र,ती ईमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जिबगाव येथील प्राथमिक स्वास्थ केन्द्राच्या नवीन इमारती बांधकाम करण्यासाठी राकेश गोलेपेलीवार यांनी अनेक प्रत्र केले असताना ३ कोठी ४६ लाख रुपये निधी मंजुर होत, प्रा आरोग्य केंद्र नविन ईमारतीचा बांधकाम पुर्ण झाला. मात्र मा ईमारत धुळखात पडली आहे.
तालुक्यातील अनेक वर्षांपासून जिबगांव येथील प्रा. आरोग्य केंद्र अंगणवाडी ईमारतीच्या दोन छोट्याशा खोलीत स्थलांतर करण्यात आले. मात्र अगंणवाडी ईमारत पाऊसात गळत असल्यामुळे छोट्याशा उपकेंद्र येथे दोन तीन वर्षापासुन स्थालानंतर करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी याना मोठ्या अडचणींचा सामना करून आरोग्य सेवा देताना दिसुन येत आहेत. तेव्हा सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी त्यावेळचे तत्कालीन आमदार प्रा आ अतुल देशकर यांना जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र च्या ईमारतीचे बांधकाम करण्यासाठी पाठपुरवठा केले असता प्रा.देशकर यानी दखल घेत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे सोबत स्वतः बसुन स्मशानभुमीची सात एकर जागे पैकी तिन एकर जागा प्रा.आरोग्य केंद्र साठी राखीव करून घेतली. त्यानंतर एक कोटी विस लाख रुपये नीधी मंजुर करण्यात आले होते. पंरतु ती निधी इमारत बांधकामासाठी कमी पडत होती. त्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री व अर्थ मंत्री असताना त्यांचेकडे सामाजीक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यानी पाठपुरावा केला असता अंदाजे तिन कोटी छेचाळीस लाख सत्ताविस हजार रुपये मंजूर करून घेण्यात आले. त्यानंतर आलेल्या निधी खर्च करून बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र आरोग्य सेवा मिळावी म्हणून ईमारती बांधकाम करण्यात आली. परंतु ईमारतीचे बांधकाम पुर्ण होऊनही ईमारत धुळ खात असल्याने ईमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडण्यात यावी व उत्तम सेवा मिळावी अशी मागणी होत आहे. अशातच जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ईमारतीची पाहणी करण्यासाठी अनेक नेते व अधिकारी यांनी वेळोनवेळी भेट देत प्रा आरोग्य केंद्र च्या ईमारतीची पाहणी करीत असतात पण प्रा आरोग्य केंद्र ईमारतीचा लोकार्पण सोहळा केव्हा पार पडणार आहे याचे कडे कुणाचे लक्ष वेधत नसल्यामुळें जिबगांव परिसरातील जनता त्रस्त आहे. तर दुसरी कडे प्रा आरोग्य धुळखात पडली असुन सर्वाना विसर पडले आहेत. याकडे लक्ष कोण देणार व आरोग्य प्रा इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पाडुन उत्तुम आरोग्य सेवा मिळणार का? असे प्रश्न उपस्थित होत होते. तेव्हा ग्रा प सदस्य, माजी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी मा. उद्ववजी ठाकरे मुख्खमंत्री मा. राजेश टोपे आरोग्य मंत्री महा रा, व जिल्हाचे पालकमंत्री तथा सावली-ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार मा. विजय वडेटीवार,यांना सुध्दा पत्र पाठविलेले आहेत तर, चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते,माजी चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,जि प अध्यक्ष चंद्रपुर संध्याताई गुरुनुले, मुख्यकार्यकारी अधिकारी जि प चंद्रपुर,जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपुर यांना प्रत्र पाठवण्यात आले असताना देखील मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.
3 कोटी खर्च करुन बांधण्यात आलेली आरोग्य केन्द्राची इमारत धुळखात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 09, 2022
Rating:
