ओबीसींना आरक्षणाचा फायदा मिळावा- डॉ. स्मिता मेहेत्रे


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे ५२ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि तो ओबीसींचा हक्क आहे.असे मत महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या जेष्ठ सदस्या डॉ. स्मिता निशिकांत मेहेत्रे (राणेकर )यांनी व्यक्त केले. त्या उपराजधानी नागपूर येथे राष्ट्रीय आेबीसी महासंघ तथा राष्ट्रीय आेबीसी महिला महासंघाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बाेलत हाेत्या.

जणगणनेसाठी ओबीसींनी हक्काची लढाई लढावी असे प्रतिपादन राष्ट्रीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनी केले. ओबीसी चळवळ घराघरात पोहचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.अशी अपेक्षा आयोजक नयना झाडे यांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केली.याप्रसंगी कल्पनाताई मानकर,शरद वानखेडे, सुभाष घाटे, आदींनी ओबीसींचे प्रश्न व उपाय यावर प्रकाश टाकला.

पार पडलेल्या या कार्यक्रमाला गुणेश्वर आरीकर, सुषमा भड, डॉ.शरयु तायवाडे, राजकुमार घुले,प्रवीण बावनकुळे, विजया धोटे, ईश्वर ढोले,मंगला देशमुख, डॉ.जिवेश पंचभाई, गिरीश पांडव, परमेश्वर राऊत, एकनाथराव काळमेघ आदीं उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अरूणा भोंडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार वीणा बेलगे यांनी मानले.
ओबीसींना आरक्षणाचा फायदा मिळावा- डॉ. स्मिता मेहेत्रे ओबीसींना आरक्षणाचा फायदा मिळावा- डॉ. स्मिता मेहेत्रे Reviewed by सह्याद्री चौफेर on January 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.