मूर्तिकार श्री विश्वास बुरडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मूर्तिकार संघटनेला बुरडकर परिवारातर्फे आर्थिक मदत.

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : येथील प्रसिद्ध मूर्तिकार व कला शिक्षक स्व. श्री विश्वास (बंडू भाऊ) विठ्ठलराव बुरडकर यांचे दिनांक ०३/०१/२०२२ रोजी रात्री ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या सहवासात अनेक मूर्तिकार उदयास आले. त्यांनी केलेल्या कलाकृती आजही वणीकरांच्या आठवणीत आहेत. आपल्या उज्वल भविष्यासाठी वणी शहरातील मूर्तिकार एकत्र यावे आणि संघटित होऊन काम करावे अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली होती. तंत्रज्ञानाच्या युगात कलाकारांच अस्तित्व कायम राहावे यासाठी स्थापन झालेल्या वणी मूर्तिकार संघटनेला स्व. श्री विश्वास विठ्ठलराव बूरडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.

मूर्तिकार संघटनेच्या वतीने मूर्तिकार नत्थू डुकरे, रुपेश कपाटे, रवींद्र पाटाळकर, सुहास झिलपे गणेश चुरे आदी उपस्थित होते. या वेळी बोलत असताना बुरडकर यांच्या पत्नी शालिनी बुरडकर म्हणाल्या " कलाकारांना आपल्या आयुष्यात अनेक कसोटींना सामोरे जावे लागते, कला जपत असताना आपल्या मुला बाळांच्या भविष्याचा विचार करून समृद्ध आयुष्याकडे ही लक्ष द्यावे.
यासाठी शहरातील कला प्रेमी मंडळींनी सुध्दा कलाकारांचे अस्तित्व कायम राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे."
मूर्तिकार श्री विश्वास बुरडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मूर्तिकार संघटनेला बुरडकर परिवारातर्फे आर्थिक मदत. मूर्तिकार श्री विश्वास बुरडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मूर्तिकार संघटनेला बुरडकर परिवारातर्फे आर्थिक मदत. Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.