वणी येथे संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी द्वारा आयोजित संत रविदास जयंती वार्षिक नियोजन बैठक संपन्न


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : समतेचे दूत संत रविदास यांची जयंती महोत्सव वणी उपवीभागीय क्षेत्रातर्फे वणी शहरात नियोजनबद्ध पद्धतीने थाटा-माटात साजरा केला जातो,पण यावर्षी कोविड-१९ ऑमायक्रोन च्या प्रदूर्भावाने संत रविदास जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय वणीतील समाज बांधवांनी वार्षिक बैठकीत घेतला आहे.

"ऐसा चाहू राज मैं, जहाँ मिले सबन अन्न।
छोट-बडे सब सम बसे,रविदास रहे प्रसन्न।
असे समतेचा संदेश देणारे संत रविदास यांची १५ फेब्रुवारी ला जयंती अख्या जगात साजरी केली जाते. वणी शहरात सुद्धा अखंड गेले ३-४ दशक हा कार्यक्रम चर्मकार समाजातर्फे मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो,मागच्या व यावर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्याने परिस्थितीची जाण ठेवत,अगदी लहान स्वरूपात अभिवादन कार्यक्रम घेण्याचा ठराव समाजातर्फे वार्षिक बैठकीत घेण्यात आला.
सदर बैठकीत मागच्या वर्षीच्या जयंती सोहळा जमा खर्चाचे हिशोब वाचन करण्यात आला व त्याला उपस्थित सर्व सदस्यांनी मंजुरी देण्यात आली. यावेळी निमंत्रकानी आभार व्यक्त करत बैठकीची सांगता झाली.

यावेळी चर्मकार समाजाचे जेष्ठ,तरुण तसेच महिला वर्ग व जयंतीची आयोजन समिती संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी चे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी येथे संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी द्वारा आयोजित संत रविदास जयंती वार्षिक नियोजन बैठक संपन्न वणी येथे संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी द्वारा आयोजित संत रविदास जयंती वार्षिक नियोजन बैठक संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.