|| वाढदिवस || अभिष्टचिंतन ||
दीर्घ राजकीय वाटचालीतून राजकारणाचा दांडगा अनुभव आत्मसात असतांनाही राजकारणात संयम बाळगणारे संयमी राजकीय नेते म्हणून संजय देरकर यांनी राजकीय क्षेत्रात आपली एक वेगळीच ओळख निर्माण करून ठेवली आहे. सामाजिक प्रश्न राजकीय माध्यमातून सोडविण्याची कला साधतांनाच राजकारणातून समाजकारणाची सांगड घालणारे धुरंदर नेते म्हणून संजय देरकर ओळखले जातात. राजकारण करतांनाच त्यांनी सामाजिक कार्याचाही वारसा जपला. सामाजिक कार्यात त्यांनी कधी राजकरण येऊ दिलं नाही. सामाजिक चळवळी उभारतांना त्यांनी सर्वांनाच सोबत घेतले. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच वर्षानुवर्षांपासून एक मोठा राजकीय व सामाजिक वर्ग त्यांच्याशी जुळलेला आहे. त्यांच्या सुस्वभावी व संयमी नेतृत्वामुळे कार्यकर्तेही त्यांच्या पासून कधी दुरावले नाहीत. त्यांनी बेरोजगार युवकांसाठी नेहमी लढा दिला. बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरिता ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून ते बेरोजगारांना घेऊन कंपन्यांमध्ये धडकले. भूमिपुत्रांना रोजगार द्यावा म्हणून त्यांनी कंपन्यांच्या व्यवस्थापकांना धारेवर धरले. सामाजिक प्रश्न हाताळणारे व जनतेचा कळवळा असणारे नेते म्हणून ते तालुक्यासह जिल्ह्यातही ओळखले जाऊ लागले आहे. राजकारणातही त्यांनी नेहमी संयम बाळगला. संयमाने राजकीय वाटचाल सुरु ठेवली. स्वतःशी जुळल्या माणसांना कधी तुटू दिले नाही. संयमी राजकारण करतांनाच ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष झाले आहेत. संयमानेच राजकारण करून ते आज यशस्वी राजकारणी ठरले आहे. आणी संयमानेच ते आपले ध्येय गाठतील याची त्यांच्याशी जुळलेल्या सर्वांनाच खात्री आहे.
अशा या संयमी, सुस्वभावी, प्रेमळ व मनमिळाऊ नेत्याचा आज वाढदिवस आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !