निवडणूक धुराळा : दुसऱ्या टप्यासाठी 19 उमेदवार रिंगणात

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

मारेगाव : येथील नगरपंचायत निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यात तीन प्रभागाची निवडणूक दिन.18 जानेवारी 2022 रोजी होऊ घातली असून तीन प्रभागामध्ये 19 उमेदवार रिंगणात आहेत.

प्रभाग क्र. पाच मध्ये 5, प्रभाग क्र. सहा मध्ये 6, तर प्रभाग क्र. चौदा मध्ये 8 असे आहेत.

मारेगाव नगरपंचायत च्या 14 प्रभागातील निवडणुकीचा पहिला टप्पा दि.21 डिसेंबर रोजी 2021 रोजी संपला असून,यातील ओबीसी आरक्षणाच्या वादात तीन प्रभागाची निवडणूक थांबली होती त्याचा दुसरा टप्पा 18 जानेवारी रोजी होणार आहे.
मारेगावकरांच्या भावनावर प्रत्येक निवडणुकीत दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना फसवणुकीची जाण करुण देण्यासाठी आमचे मत विकासाला आता असेल अशा अनेकांच्या प्रतिक्रिया गल्लीबोळात उमटत आहे. आता खरं काय आणि खोटं येत्या 19 जानेवारीला निकाल  समोर येईलच...



निवडणूक धुराळा : दुसऱ्या टप्यासाठी 19 उमेदवार रिंगणात निवडणूक धुराळा : दुसऱ्या टप्यासाठी 19 उमेदवार रिंगणात Reviewed by सह्याद्री चौफेर on January 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.