सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
राजूर हे चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात अनेक महापुरुषांच्या नावांचे चौक आहेत. महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिन व अनेक वैचारिक कार्यक्रम राजूर या गावात वेगवेगळ्या संघटनांकडून घेण्यात येतात. यातूनच प्रेरणा घेऊन गावातील काही युवकांनी फातिमा शेख यांच्या जयंती निमित्त राजूर येथील एका चौकाला फातिमा शेख यांचे नाव देऊन त्यांच्या नावाचे नामफलक लावले, व नागरिकांच्या उपस्थितीत नामफलकाचे उद्घाटन करून फातिमा बीबी यांची साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरोज मुन, महेश लिपटे, रोहित साव यांनी फातिमा शेख यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नूर शेख, अक्षय खोब्रागडे, भगत, दिनेश धोटे, ताहिद शेख यांनी सहकार्य केले.
राजूर येथे पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 10, 2022
Rating:
