सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
संपूर्ण जगात सध्या कोरोनाने थैमान घातले असून सर्वत्र नियमावली महाराष्ट्र शासनाकडून लादण्यात आली आहे. दिनांक 14 ला चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चंद्रपूर-नागपूर महामार्गावर सायंकाळी अंदाजे सहा वाजताच्या दरम्यान, रत्नमाला चौका नजिक नागपूर कडून येणाऱ्या ट्रॅव्हल्स जे योग्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना अचानक ट्रॅव्हल्स चा समोरील चालता टायर फुटल्याचे चर्चा आहे. यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण बिघडले व डिव्हाडर वरून दुसऱ्या मार्गाने चंद्रपूर कडून नागपूर कडे जात असलेल्या ट्रकला समोरासमोर भिडल्याने मोठा भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रक क्र. (MH-34 B-G9540) चालक अमोल भुजाडे (३५) रा. चिखलगाव,वणी आणि ट्रॅव्हल्स क्र. (MH-40A-80481) शेख शबीर शेख अहेमद (48) चंद्रपूर हे दोन्ही चालक जागीच ठार झाले. दरम्यान, असंख्य बघ्यांची गर्दी उसंडून आली होती. अपघातात काही जखमींची नाव समोर आली ती पुढील प्रमाणे :
हर्षा झाडे (वंधली),सुमित मानकर (वणी),
प्रवीण घाटे (वरोरा), प्रणाली नंदकटे (टेमुर्डा),
सुरज दाते (मजरा), संतोष गाळगटे (भद्रावती),
रीना बागेसर, भोजराज बागेसर, अनिता परचाके (घुग्गुस), रुक्मा तुलस (कोरपना), सविता रांगडे,
प्राची झगडे, सरस्वती डाहुले, आवेश अहमद (घुग्गुस) हे असून जखमी आहे, घटनेची माहिती पोलीस विभागाला लागताच घटनास्थळी फौजफाटा दाखल होऊन क्रेन च्या साहाय्याने ट्रॅव्हल्स व ट्रकला काढण्याचे कार्य वृत्त लिहेपर्यंत सुरू होते.
वरोऱ्यात ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दोन्ही वाहन चालक जागीच ठार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 14, 2022
Rating:
