सुनेवर अत्याचार करून फरार झालेल्या सासऱ्याला पोलिसांनी केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना काल ९ जानेवारीला शहरात घडली. नात्याचे भान न ठेवता सुनेलाच वासनेची शिकार बनविणाऱ्या सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. काल सायंकाळी महिलेने आपल्या सासऱ्या विरुद्ध पोलिस स्टेशनला अत्याचाराची तक्रार नोंदविली होती. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासचक्र फिरवून फरार झालेल्या सासऱ्याला बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावातून शिताफीने अटक केली. स्वतःच्याच सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्यावर पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. 

वणी शहरातील एका मुलीचे २०१६ मध्ये बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावातील मुलाशी लग्न झाले होते. त्यानंतर सांसारिक जीवन सुरु असतांना मुलगी माहेरी आली, व या दिवाळी पासून ती माहेरीच असल्याचे कळते. ७ जानेवारीला महिलेचा सासरा तिला सासरी घेऊन जाण्याकरिता महिलेच्या घरी आला, व घरी कुणी नसल्याची संधी साधून तिच्यावर जबरन अत्याचार केला. दरम्यान महिलेची आई घरी आली असता तिला हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी दिसला. इनबाई समोर दिसताच सासऱ्याने तेथून पळ काढला. माहेरी आलेल्या सासऱ्याने मुलीशी केलेले दुष्कृत्य आईने मुलीच्या वडिलांना सांगितले. मुलीशी तिच्या सासऱ्याने घृणास्पद कृत्य केल्याने मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार देण्याचा निर्णय घेत ९ जानेवारीला मुलीला घेऊन पोलिस स्टेशन गाठले, व सासऱ्या विरुद्ध अत्याचाराची तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासचक्र फिरवीत महिलेवर अत्याचार करून फरार झालेल्या सासऱ्याला त्याच्या स्वगावी जाऊन शीताफीने अटक केली. बंडू नामदेव परसूटकर (५९) रा. कोठारी ता. बल्लारपूर असे या सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे. तो सेवानिवृत्त असल्याचे कळते. ५९ वर्षाच्या सासऱ्याने ३३ वर्षाच्या सुनेवर अत्याचार करून सासरा सुनेच्या नात्याला काळिमा फासला आहे. पोलिसांनी आरोपीवर भादंवि च्या कलम ३७६ (२)(f)(n), ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रवीण हिरे करित आहे.

Popular posts from this blog

तरुण विवाहितची गळफास घेऊन आत्महत्या,मारेगाव येथील घटना

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

भीषण अपघातात तरुण ठार,वणी-वरोरा महामार्गवरील घटना