महागांव : अवैध उत्खानन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलिसांनी पकडून जप्त केले.
ही कारवाई करंजखेड रोडवर करण्यात आली. एम एच २९ ए के. ३०६८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने एक ब्रास रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी ट्रॅक्टर अडवून चौकशी केली असता अनधिकृतपणे वाहतूक होत असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे ट्रॅक्टर आणि रेती असा एकूण सहा लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस कर्मचारी जाधव यांच्या तक्रारीवरून महागांव पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरु केला आहे.
रेतीसह ट्रॅक्टर जप्त : करंजखेड रोडवर कारवाई
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 10, 2022
Rating:
