सह्याद्री न्यूज | विलास पिसे
चिमुर : तालुक्यातील नेरी येथील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या वतीने एका प्रेमी जोडप्यांना विवाह बद्द करण्यात आले
येथून जवळच असलेल्या नवोदित प्रेम विर हे दोन्ही मौजा खुटाळा येथील रहिवासी असलेले स्वजातीय आहेत नवोदित वराचे नाव आहे अमोल तानबाजी चौधरी वय २७ वर्षे जात माना,व नवोदित वधु दामीनी दिनकर गायकवाड वय २४ वर्ष यांचे रितीरिवाजाने स्वगावी खुटाळा येथे साक्षगंध झालेले होते.
या दोघांमध्ये चार वर्षांपासून प्रेमसंबध होते हे विशेष
परंतु आपण साधेपणाने विवाह बद्द होवू या उद्देशाने कम खर्चिली शादी करो दहेज मत लो या उक्तीप्रमाणे या नवोदित वधु वरांनी विवाहासाठी नेरीच्या तंटामुक्त समीतीकडे अर्ज सादर केला समीतीने अर्जाची रितसर तपासणी करून उपरोक्त जोडप्यांचा आज दि.८-१-२०२२ रोज शनिवार ला ग्रामपंचायत आवारात हिंदू रिवाजाप्रमाणे विवाह लावुन देण्यात आला आहे.
या प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिदास चांदेकर, माजी तंमुस अध्यक्ष जिवन वाघे,माजी पो.पाटील शंकर पिसे, विध्यमान पोलीस पाटील शुद्धोधन घोनमोडे, रामचंद्र कामडी, डॉ.रमेश राउत, संजय नागदेवते पत्रकार, हरिश्चंद्र बांगडे,रूस्तमखाँ पठाण, मिलिंद जांभुळकर,अभिजित कामडी, अरमान बारसागडे ग्रा.प.सदस्य खुटाळा,मानिक नगराळे,पिंटु खाटीक ग्रा.पं सदस्य, चंद्रभान कामडी उपसरपंच नेरी ग्रा.पं, सौ.सत्यभामा कामडी,गंगाबाई कामडी ईत्यादी समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी नवोदित वरवधुंला शुभशिर्वाद देण्यात आला.
नेरी तंटामुक्त समितीच्या वतिने प्रेमी युगल विवाहबद्द
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 08, 2022
Rating:
