सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चिमूर तालुका महिला राष्ट्रवादी कांग्रेसच्या अध्यक्षा प्रियंका कृष्णा बहादुरे यांच्या नेतूत्वावर विश्वास दर्शवित नेरी येथील १९ महिलांनी दि. १७ जानेवारीला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे.
स्थानिक महात्मा फुले नगरात एका हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक महिलांनी आपला सहभाग नाेंदविला होता. दरम्यान, याच वेळी नेरी नगरीतील महिलांनी तालुका महिला आघाडी अध्यक्षा प्रियंका बहादुरे यांचे नेत्रूत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवीत पक्ष प्रवेश केला.
यात मनीषा कामडी, योगिता बोरसरे, मंगला गानार, शिला अंबादे, संगिता गायकवाड, पुनम बावने, पुष्पा वाघे, भुमेश्वरी बावने, निर्मला बावने, लता सिडाम, लक्ष्मी उईके, जोसना मुगंले, सुरेखा पुनवटकर, मंगला रामटेके, ललिता कराडे, रामकला ढवळे, ताटीकाबाई अंबादे, प्नितम गेडाम, अबुली जांभूळे यांचा समावेश आहे.
पक्ष प्रवेश वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नेरी येथील महिलांचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 18, 2022
Rating:
