सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
हिंगणघाट : हिंगणघाट तालुका महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्षा मंगलाताई ठक यांनी आपल्या पदाचा राजीनामा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे यांचेकडे सुपूर्द केला.
मंगलाताई ठक यांनी गेल्या तीन वर्षांपासून महिला काँग्रेसच्या माध्यमातून हिंगणघाट तालुक्यासाठी मोठे योगदान दिले होते, उपेक्षित घटकांना एकत्रित करून व सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून त्यांनी महिला काँग्रेसच्या माध्यमातून हिंगणघाट तालुक्यात मोठे काम उभे केले होते. परंतु काँग्रेस च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सामाजिक न्याय आणि प्रश्न तथा समाजपयोगी कार्यासाठी सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या त्या जेष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून वृद्धांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्रभर फिरून करित आहे.
मंगलाताई ठक यांचा महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 18, 2022
Rating:
