टॉप बातम्या

तूझ्या कालच्या वस्तीची आज कॉलनी झाली - शंकर घुगरे


"तुझ्या कालच्या वस्तीची
आज कॉलनी
झाली. 
माझी वस्ती,मात्र अजूनही
तशीच अंधारलेली
लाचार अर्ध पोटी उपाशी
निजलेली
भिजलेली
विझलेली!"

संदर्भ :
कवी म्हणतात, "काल जी तुझी वस्ती होती त्याची आज कॉलनी झाली आहे". आज बघता बघता झपाट्याने शहरीकरण वाढलं असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु आजही काही वस्त्या ह्या शहरीकरणाच्या कोसोदूरच आहे. तिथे अजूनही विकास नावाचं खेळणं खुळखुळत नसून अंधार गरीबी आणि लाचारीचे जीवन लोक आजही जगत आहे.
भारत विकसीत होतोय भारतातील श्रीमंत लोकं,महानगरे आहे. लोकं सर्वं तंत्रज्ञाना चा वापर करतात. भारतात मेट्रो आली आहे आणि आपल्या देशात आजही झोपडपट्टी मध्ये लोक राहतात तिथे गरीबांना दोन वेळेच जेवणाचा प्रश्न पडतो, अनेक भागात लोकं अन्याय सहन करतात,  बेरोजगारीने कळसच गाठला आहेत. असे लेखकांने आपल्या कवितेतून लोकं, वस्ती शहरीकरण, गरिबी, लाचारी व बेरोजगारी मांडली आहे.
  
कवी : शंकर घुगरे, वणी
संपर्क : 9657440743
Previous Post Next Post