राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची कोरोना विषयक जनजागृती रॅली काडून जयंती साजरी
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रमता राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर, डॉ. सोडणर सर, डॉ. चव्हाण सर, डॉ. कुलकर्णी सर डॉ. अडसरे सर, डॉ. राऊत सर व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. विलास असुटकर, श्री. नितीन कापसे, श्री. नितीन गवळे आदींनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सोडणर यांनी राजमाता जिजाबाई यांचे शेतीविषयक धोरण व स्वामी विवेकानंदानी जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण व कार्य यावर आपले विचार मांडले तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी आचल किन्हेकार व शुभांगी मुनघाटे यांनीसुद्धा आपले विचार मांडले. सध्या कोरोनाचे संक्रमण वाढले असून त्या अनुषंगाने शहरात कोरोना जनजागृती रॅली व गरजूना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
कार्यक्रमचे नियोजन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख व महिला कार्यक्रम अधिकारी शेंडे मॅडम यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची कोरोना विषयक जनजागृती रॅली काडून जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 13, 2022
Rating:
