कबड्डी स्पर्धेत सिंधी रेल्वे व यवतमाळ संघ विजयी



सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ यांचे वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेत 'अ' गटात शिवनेरी क्रीडा मंडळ सिंधीरेल्वे तर 'ब' गटात बॉईज क्रीडा मंडळ यवतमाळ यांनी विजेतेपद प्राप्त केले. 
   
दि. ४ जानेवारीपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेत 'अ 'गटात प्रथम बक्षीस शिवनेरी क्रीडा मंडळ सिंधी रेल्वे, द्वितीय बक्षीस सुवर्ण क्रीडा मंडळ यवतमाळ तर तृतीय बक्षीस सुभाष क्रीडा मंडळ वडगाव (यवतमाळ) यांनी मिळविले तर 'ब' गटात प्रथम बक्षीस बॉईज क्रीडा मंडळ यवतमाळ, द्वितीय बक्षीस स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ मोहबाळा, तृतीय बक्षीस छत्रपती क्रीडा मंडळ यवतमाळ यांनी प्राप्त केले. या कबड्डी स्पर्धेचे 'अ ' गटात प्रथम बक्षीस 51000/ द्वितीय बक्षीस 31000/ तृतीय बक्षीस 21000/ तर ब गटात प्रथम पारितोषिक 21000/द्वितीय 15000/ तर तृतीय 11000 / असे बक्षीस होते.

या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी खा. बाळूभाऊ धानोरकर, मारेगाव कृ. उ. बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे ,जि. प. सदस्या सौ. अरुणाताई खंडाळकर उपस्थित होते तसेच या कबड्डी स्पर्धेच्या समारोप प्रसंगी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थिती दर्शविली. या कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच प्रफुल झाडे, कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे, माजी सरपंच भास्कर धानफुले, रामकृष्ण चौधरी, सुरेश चांगले, मंगेश देशपांडे, ग्रा. सदस्य माणिक कांबळे, विठ्ठल मांढरे, राजकुमार बोबडे, अनंता जुमळे, भास्कर राऊत, सुरेश नाखले, अखिलेश कांबळे, अयुब पठाण, आदी उपस्थित होते.
या कबड्डी स्पर्धेच्या यशस्वितेकरिता न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अक्षय सराटे, रुपेश जुमनाके, समाधान सीरामे, सुरज डंभारे, लोकेश आभारे, चंद्रशेखर मडावी, गणेश मांढरे, पंकज आंबुलकर, अमित हरणे, संतोष जुमळे, हितेश मांढरे, मयूर झाडे, मुकेश बावणे, अमरदीप वैद्य, रमजान पठाण, शुभम मांढरे, राहील पठाण, धम्मपाल नगराळे, योगेश जोगी, वैभव बावणे, गणेश कोसरे, पवन नाखले, शुभम मांढरे, प्रज्वल झाडे, रमजान पठाण, मयूर आस्कर तसेच समस्त गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.
कबड्डी स्पर्धेत सिंधी रेल्वे व यवतमाळ संघ विजयी कबड्डी स्पर्धेत सिंधी रेल्वे व यवतमाळ संघ विजयी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 13, 2022 Rating: 5
Powered by Blogger.