सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी : दि.२६ येथील जैताई मंदिराचे देवीचे परमभक्त पुजारी
साधुबुवा संताने ह्यांना गणराज्य दिनी रात्री ८ च्या सुमारास मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी देवाज्ञा झाली.
गेल्या दोन महिन्यां पासून व्रुध्दापकाळामुळे ते आजारी होते. वर्धेला कन्या गीताकडे राहून औषधोपचार घेतल्यानंतर त्यांना आज सायं. ५ वाजता वणीला आणण्यात आले.
वणीला पोहचताच तीन तासानंतर हा देवीभक्त देवीचरणाशी कायमचा लीन झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी गीता, जावई,
नातवंड आणि त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक भाविक आहेत.
त्यांची अंत्ययात्रा मंदिरातून गुरुवार दि. २७ ला सकाळी ११ वाजता निघेल.
जैताई मंदिराचे पुजारीसाधुबुवा संताने ह्यांना देवाज्ञा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 27, 2022
Rating:
