टॉप बातम्या

जिल्हा परिषद निधीतून विरकुंड व नवेगाव येथे बांधण्यात येणार सिमेंट रस्ते, जी.प. सदस्य संघदीप भगत यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : विरकुंड गट ग्रामपंचायते अंतर्गत जिल्हा परिषद निधीतून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचे नुकतेच भूमिजन करण्यात आले. विरकुंड व नवेगाव येथे जिल्हा परिषद निधीतून हे सिमेंट रस्ते बांधण्यात येणार असून जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. विरकुंड गट ग्रामपंचायतेने गावातील विकासकामांना प्राधान्य देत गावकऱ्यांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. गावातील रस्त्यांची समस्या दूर करण्याकरिता गावात सिमेंट रस्ते बांधण्याची कामे ग्रामपंचायतेने हाती घेतली असून जिल्हा परिषद निधीतून रस्त्यांच्या बांधकामाचा मुहूर्त साधण्यात आला आहे. गावातील रस्ते विकासाबरोबरच गावातील पुतळ्यांचे सौंदर्यीकरण देखील करण्यात येणार असून त्याकरिता देखील जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिला आहे. विरकुंड बसस्थानकाजवळील बाबुराव शेडमाके यांच्या पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरणाचे देखिल जी.प सदस्य संघदीप भगत याच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी विरकुंड गट ग्रामपंचायतेच्या सरपंचा कविता सोयाम, उपसरपंच पिनू डांगे, ग्रामपंचायत सदस्य विद्या विलास कालेकर, वर्षा प्रमोद मडावी, अमोल पारखी, सचिव भाकरे, विलास कालेकर, अशोक जोगी यांच्यासह गाववासी उपस्थित होते. 
विरकुंड गट ग्रामपंचातेने गावाच्या विकासाबरोबरच गावकऱ्यांना मूलभूत व इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला आहे. गावात स्मशभूमी अभावी अंत्यसंस्काराची होत असलेली गैरसोय देखील ग्रामपंचायतने स्मशानभूमी बांधून दूर केली. लाखो रुपयांचा निधी स्मशानभूमीच्या बांधकामाकरिता खर्च करण्यात आला. मुबलक जागेत व सर्व सोई सुविधांनी सज्ज असलेली स्मशानभूमी विरकुंड या गावात ग्रामपंचायतेने बांधली. गावाचा विकास साधण्याचे ग्रामपंचायतेचे धोरण असून गावाच्या विकासाकरिता निधी खेचून आणण्याचा विरकुंड गट ग्रामपंचायतेचा प्रयत्न राहणार असल्याचे सरपंच कविता सोयाम यांनी यावेळी सांगितले.
Previous Post Next Post