सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : शहरातील दीपक चौपाटी परिसरातील एका बार जवळ असलेल्या शेतात मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांना हा मानवी सांगाडा दिसताच ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी जाऊन मानवी सांगाडा उत्तरीय तपासणीकरिता ताब्यात घेतला. मानवी सांगाडा हा पुरुषाचा की महिलेचा, याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. हा मानवी सांगाडा तेथे कसा आला, त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला होता की, आणखी काय, या रहस्याचाही उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून बेपत्ता असणाऱ्यांची चाचपणी केली जात आहे.
आज २१ जानेवारीला दुपारच्या सुमारास पोलिसांना दीपक चौपाटी परिसरात मानवी सांगाडा पडून असल्याची माहिती मिळाली. ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी पोलिस पथकासह त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे अर्धवट मानवी सांगाडा आढळून आला. परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी पंचनामा करून मानवी सांगाडा उत्तरीय तपासणीकरिता ताब्यात घेतला. तो मानवी सांगाडा तेथे कसा आला, हे अद्याप कळू शकलेले नाही. हा मानवी सांगाडा महिला की पुरुष, हे गूढ उलगडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा व कधी झाला याचा शोधही पोलिसांना घ्यावा लागणार आहे. मात्र, हा मानवी सांगाडा आढळल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. हा मानवी सांगाडा नेमका कुणाचा, याचा शोध घेणं पोलिसांसमोर एक आव्हान ठरणार आहे.
दीपक चौपाटी परिसरात आढळला मानवी सांगाडा, पोलिसांसमोर गूढ उलगडण्याचे आव्हान !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 21, 2022
Rating:
