टॉप बातम्या

वेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्या तातडीने सोडवा - जय जगन्नाथ क्रीडा मंडळाची मागणी


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : तालुक्यातील वेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे विविध समस्यांचे माहेरघर झाले आहे. या केंद्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी व जगन्नाथ क्रीडा मंडळाच्या तर्फे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याचे पाणी व केंद्राच्या परिसरातील साफसफाई होत नसल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. परिणामी विविध समस्याने रुग्णांचे हेळसांड होत असून, तिसऱ्या लाटेत मोठया प्रमाणात आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या मार्गाचे बारा वाजले असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडे व मार्गाच्या कडेला असलेला अतिक्रमण विळखा, यासह विविध समस्यांचे त्वरित निरसन करण्याकरिता ग्रामस्थ व जय जगन्नाथ क्रीडा मंडळाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देते वेळी तेजस थेरे, संतोष ठक, सचिन ढोके, प्रफुल ठावरी, गजानन सूर, प्रजोत कापसे, प्रफुल सूर, प्रशांत मोहितकर, दामू ढोके, गणेश कापसे, मनीष माथनकर, सुरज ढोके, चेतन कापसे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.


Previous Post Next Post