सह्याद्री न्यूज | विलास पिसे
चिमूर : चिमूर क्रांती जिल्हा झाला पाहिजे हे चिमूर वाशीय जनतेचे व या परिसरातील जनतेची खूप दिवसापासूनची ही मागणी आहे. देशात पहिले स्वतंत्र झालेले गाव म्हणजे 'चिमूर', या चिमूर चे सुपुत्र बालाजी रायपूरकर हे शहीद झाले. हा ऐतिहासिक वारसा या चिमूर तालुक्याचा आहे. चिमूर जिल्हा झाला पाहिजे...त्याचे कारण म्हणजे छोटे मोठे काम करण्यासाठी या चिमूर परिसरातील नागरिकांना चंद्रपूरला जावे लागते आणि तिथे गेले तर,अधिकारीवर्ग हजर राहत नाही. किंबहुना काम हे वेळेवर होत नाही. शिवाय येण्या-जाण्याचा वेळ लागतो, पैसा लागतो. चिमूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी आज चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती साठी मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, प्रा राम राऊत, गजानन अगडे, प्रा संजय पिठाडे, रमेश कराळे, संजय घुटके, सारंग दाभेकर, अविनाश अगडे, सिंधुताई रामटेके, विजय डाबरे, बाळकृष्ण बोबाटे प्रकाश बोकारे,विकास नवले,योगेश अगडे आदी उपस्थित होते.
चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत दिले निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 05, 2022
Rating:
