सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
रंगनाथ नगर येथे सार्वजनिक ठिकाणी एक उपद्रवी युवक हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी तत्काळ रंगनाथ नगर येथे पोलिस पथक पाठविले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना आरोपी हा हातात तलवार घेऊन परिसरात धुमाकूळ घालतांना आढळून आला. तलवारीसह परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील तलवार जप्त केली आहे. मुठीसह ८० सेमी लांबी असलेल्या या तलवारीची गोलाई ६८ सेमी एवढी आहे. स्वतःजवळ शस्त्र बाळगणाऱ्या आरोपी निलेश दुर्वास पाटिल याच्यावर पोलिसांनी आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याआधीही पोलिसांनी धारदार शस्त्रासह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या तेथीलच एका आरोपीला अटक केली होती. चित्रपटांमधील भडक दृश्य बघून युवकांमध्ये टपोरीपणा वाढू लागला आहे. भाईगिरीचा आव आणून ते परिसरात दहशत निर्माण करू लागले आहेत. शस्त्रासह धुमाकूळ घालून चर्चेत येण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले आहेत. त्यांना कायद्याची भाषा समजविण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून तिसरा कुणी हातात शस्त्र घेऊन परिसरात धुमाकूळ घालण्याची हिम्मत करणार नाही.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, स.फौ. डोमाजी भादीकर, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरिन्द्र कुमार भारती, संजय शेंद्रे, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास सुदर्शन वानोळे करीत आहे.
तलवार हातात घेऊन परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 27, 2022
Rating:
