टॉप बातम्या

अवैध रेती तस्करास महसूल विभागाचा परत एकदा दणका, काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारेंनी पाठलाग करुन अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजावर अकुंश तथा दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना विशेष निर्देश दिले असुन राजूराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शना खाली काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व काेतवाल रुपेश पानपाहटे यांनी काल गुरुवार दि.२७ जानेवारीला रात्रीला गुप्त माहितीच्या आधारे स्वताच्या जिवाची पर्वा न करता नामे प्रदीप मारोती कातकडे राहणार अंतरगाव बुजरुक यांचे अवैध रेतीचे M H34-AP 3276 या क्रंमाकाचे ट्रैक्टर पाठलाग करुन पकडले. विशेष उल्लेखनीय बाब अशी की रेतीने भरलेल्या ट्राँलीला काेणताही क्रमांक नव्हता .सदरहु ट्रॅक्टर पैनगंगा रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक करीत हाेता. उपरोक्त ट्रॅक्टरचा मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे व ,कोतवाल रुपेश पाहणपटे यांनी लगेच जप्तीनामा करून ताे ट्रॅक्टर काेरपना तहसील कार्यालय येथे काही कर्मचा-यांचे देखरेखेखाली दंडात्मक कारवाई साठी रवाना केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान या कारवाईची माहिती तातडीने राजेन्द्र पचारे यांनी तहसीलदार वाकलेकर यांना भ्रमणध्वनी वरुन दिली. उपरोक्त कारवाईत प्रकाश कामलवार व वाहन चालक सुरेश नागोसे यांनी माेलाचे सहकार्य केले. काेरपनाचे मंडळ अधिकारी पचारे यांच्या या धडक कारवायांमुळे या भागातील अवैध रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे. हे तितकेच सत्य आहे.या पूर्वी सुध्दा मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी अवैध गाैण खनिजाच्या बाबतीत धडक कारवायां केल्या आहे.काल केलेल्या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.

ही कारवाई केली तेव्हा रेती तस्करांच्या पाळत ठेवणां-या व्यक्तिंना देखिल याचा थांगपत्ता लागला नाही. हे विशेष !
Previous Post Next Post