१० व ११ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज व ऐलाे अलर्ट जारी; काही भागात झाली साेमवारी अल्प पावसाची नाेंद


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : सोमवार दि.१० जानेवारी व मंगळवार दि.११जानेवारी या दाेन दिवसांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज (Orange) व ऐलाे (yellow) अलार्ट जारी केला आहे. आज जिल्ह्यातील काही भागात सकाळी सकाळी अल्पश्या पावसाची नाेंद झाली तर या पावसामुळे काहींनी मूल नगरीत छत्र्यांचा उपयाेग केल्याचे दिसून आले. उपरोक्त दाेन दिवसांत जिल्ह्यात विजेचा कडाकडाट व मेघ गर्जनेसह पाऊस हाेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

या बाबतीत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडुन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यांत आले असून, दरम्यान सकाळी झालेल्या या रिमझिम पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे.
१० व ११ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज व ऐलाे अलर्ट जारी; काही भागात झाली साेमवारी अल्प पावसाची नाेंद १० व ११ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज व ऐलाे अलर्ट जारी; काही भागात झाली साेमवारी अल्प पावसाची नाेंद Reviewed by सह्याद्री चौफेर on January 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.