काेरपना भागातील मुजाेर रेती तस्कराच्या विराेधात पाेलिस स्टेशनला तक्रार दाखल !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : काल शुक्रवार दि. २१जानेवारीला अतिदुर्गम काेरपना भागातील काेडशी बुजरुक पैनगंगा नदीच्या पात्रातुन पहाटेला अवैधरित्या रेती नेणारे एक ट्रॅक्टर पाेलिस पाटील पांडुरंग जरीले, उपसरपंच बंडु नामदेव वासेकर व गावातील काही नागरिकांनी अडविले परंतु या सर्वांना न जुमनता ट्रॅक्टर चालक अरेरावी करीत ट्रॅक्टरसह पसार झाला .सदरहु वाहन नेतांना चालकांने उपरोक्त मंडळीच्या अंगावर ट्रॅक्टर आणण्यांचा प्रयत्न केल्याचे विश्वसनीय सुत्राने या प्रतिनिधीस काल सांगितले.

दरम्यान, या अवैध रेती ट्रॅक्टररची माहिती गावक-यांनी काेरपना मंडळाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांना सांगताच ते पटवारी दिलीप देठे व काेतवालासह घटनास्थळी दाखल झाले परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता त्यांनी लगेच तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांना या बाबतीत सविस्तर माहिती दिली. सदरहु नदीपात्रातुन रेती तस्कर नामे प्रदीप सीताराम कुडमेथे यांनी पन्नास ते साठ ब्रास रेती वाहनाने नेली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे मत मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी व्यक्त केले. उपरोक्त मुजाेर रेती तस्कराच्या विराेधात पाेलिस स्टेशन काेरपनाला पाेलिस पाटील पांडुरंग जरीले यांनी रिपोर्ट दिली आहे. पाेलिस कर्मचारी या मुजाेर अवैध रेती तस्कराचा शाेध घेत आहे. हा रेती तस्कर रात्रीला वाहना व्दारे माेठ्या प्रमाणात रेती चाेरुन नेत हाेता असे गावक-यांचे म्हणणे आहे .आता या मुजाेर रेती तस्करावर नेमकी काेणती कारवाई हाेते.

या कडे काेरपना वासियांचे लक्ष लागले आहे .विशेष म्हणजे या मुजाेर रेती तस्कराच्या ट्रॅक्टर व ट्राँली ला कुठल्याही प्रकारचा नंबर दिलेला नाही.  
काेरपना भागातील मुजाेर रेती तस्कराच्या विराेधात पाेलिस स्टेशनला तक्रार दाखल ! काेरपना भागातील मुजाेर रेती तस्कराच्या विराेधात पाेलिस स्टेशनला तक्रार दाखल ! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 22, 2022 Rating: 5
Powered by Blogger.