सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
शिवसेनेत कार्यरत असल्यापासून विविध सामाजिक व राजकीय उपक्रम राबवून शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून समोर आलेल्या अजिंक्य शेंडे यांची त्यांच्या कार्यतत्परतेमुळे युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली. उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडतांना अजिंक्य शेंडे यांनी आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करतांनाच त्यांच्या जयंती निमित्त रुग्ण व निराधार वृद्धांना फळे वाटप केली.बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील वृद्धांना फळांचे वाटप करून त्यांच्या वास्तववादी जीवनाविषयी हितगुज करतांनाच काही क्षण त्यांच्या सहवासात घालवून त्यांच्या निराधारतेला शब्दांनी बळ देत त्यांचे नैराश्य दूर करून त्यांच्यात उत्साह भरण्याचा अजिंक्य शेंडे यांनी काही वेळ का होई ना आत्मीयतेने प्रयत्न केला. त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या व उपचार घेणाऱ्या रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करून तेथील रुग्णांची उपचाराबाबत आस्थेने विचारपूस केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक भालचंद्र आवारी यांच्या उपस्थितीत युवासेनेचे अजिंक्य शेंडे व शिवसेनेचे राजू तुराणकर यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात निराधार वृद्ध व उपचारार्थी रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आल्याने त्यांना सर्वांचाच भरभरून प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला राजू तुराणकर, नामदेव शेलवाडे, दीपक कोकास, महेश पहापडे, राजू पारोडे, मिलिंद बावणे, स्वप्नील ताजने, ध्रुव येरणे, उमेश चेडे, सोमेश्वर गेडेकर, पवन सोनू फाये, सौरभ धानोरकर, अवि राजूरकर, अजय शिवणी, मयूर क्षीरसागर, श्रीकांत सुशोणकर, गोलू सिडाम, संकेत कार्लेकर, संजय कवाडे, प्रितम मत्ते, योगेश मजगवळी, सौरभ चिंचोळकर, चेतन काकडे, अभि नागपुरे, तुळशीराम काकडे, अनिकेत भेंटाले, साकेत भुजबळराव, अविनाश शिवंतीवार, आकाश गोडे, हर्षल बिडकर, गोलू हंसकार, युवराज ताजने, नीरज चौधरी आदी शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी, युवासेनेच्या वतीने करण्यात आले फळ वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 23, 2022
Rating:
