नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिनी नगर सेवा समितीचा अखंड स्वच्छतेचा जागर


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : नगर सेवा समिती व शिवसेना वणी शहर तर्फे आज पहाटे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये स्वच्छता अभियान राबवून अभिवादन करण्यात आले त्यानंतर वणी शहरातील त्रिमूर्ती चौकामध्ये असलेल्या सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर स्वच्छता अभियान राबवून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेवा समितीचे अध्यक्ष नामदेव शेलवडे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजू तुराणकर, नगर सेवा समितीचे राजेंद्र साखळकर, महेश लिपटे, शंकर टिकले गुरुजी शिवसेनेचे सहकार क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मिलमिले, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, माजी युवासेना शहर प्रमुख ललिता लांजेवार, शिवसेना शाखाप्रमुख जनार्दन थेटे, गुलाब आवारी, नगर सेवा समितीचे दिनकर ढवस गुरुजी ज्योतीताई साखळकर, विकास जैपुरकर उपस्थिती होते.
स्वच्छतेचा जागर करून या महापुरुषांना हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिनी नगर सेवा समितीचा अखंड स्वच्छतेचा जागर नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिनी नगर सेवा समितीचा अखंड स्वच्छतेचा जागर Reviewed by सह्याद्री चौफेर on January 23, 2022 Rating: 5
Powered by Blogger.